BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एस टी फेऱ्या कागदावर न रहाता प्रत्यक्ष अमलात आणा



फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३ शिराळा,ता.२२:शिराळा एस.टी आगारासाठी नव्याने वीस बसेस शासनाकडून मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे मागणी केली असून त्याला यश येईल असा विश्वास व्यक्त करत एस.टी फेऱ्याचे नियोजन फक्त कागदावर न करता प्रत्यक्ष अंमलात आणा.शालेय विद्यार्थी,वयोवृद्ध लोक यांची गैरसोय होणार नाही यांची काळजी घ्या असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. शिराळा एस.टी आगार येथे आढावा बैठक आमदार सत्यजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बोलत होते.यावेळी सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे,विभागीय वाहतूक अधिकारी विजयसिंह मोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी.पाटील, रणजीतसिंह नाईक,विकासराव देशमुख,सम्राट शिंदे उपस्थित होते. यावेळी आमदार देशमुख म्हणाले,एस.टी.च्या बाबतीत लोकांच्या तक्रारीचा विचार करुन एस.टीच्या फेऱ्या वाढवून शालेय विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या.सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. त्यामुळे वेळेवर एस टी.गाड्या फेऱ्या सोडण्यात याव्यात.वयोवृद्ध प्रवाशांना चांगली सेवा द्या.लांब पल्याच्या गाड्या फिरत असताना ग्रामीण व डोंगरी भागात राहणाऱ्या प्रवाशांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.एस.टी आगारामध्ये असणाऱ्या प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे याचे नियोजन करा.एस.टी फेऱ्याचे नियोजन फक्त कागदावर न करता प्रत्यक्षात अमलात आणा. नव्याने मणदूर सांगली मुक्कामी गाडी सुरू करण्या बाबत चर्चा झाली.त्याचबरोबर इस्लामपूर कोंडाईवाडी एस.टी दुपारच्या वेळेत फेरी सोडण्याबाबतच्या प्रवाशांच्या मागणीनुसार सूचना केली.यावेळी स्वप्निल देशमुख,आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे,स्थानक प्रमुख जयंत पाटील,वाहतूक निरीक्षक अजित लाड,संभाजी नलवडे,राम माने,प्रकाश पाटील,सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाबुराव जाधव,शिवाजी पाटील उपस्थित होते.
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:संपर्क 9890881782,9766293909
फेब्रुवारी २०२५
रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28

Post a Comment

0 Comments